October 16, 2024 2:23 pm

पोलीसांच्या वाहनाने स्कुल बसला दिली धडक; तालुका पोलीस ठाण्यासमोर घडला अपघात, विद्यार्थी जखमीतपास करून दोषीवर कारवाई करण्याचे DYSP कुलकर्णी यांचे संकेत

जालना – शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अंबड चौफुली वर 6 मंगळवार रोजी सकाळी साडेसात वा. दरम्यान अपघात झालाय. या घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही झाली नाहीये. जाफ्राबाद कडे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा आणि खाजगी शाळेच्या व्हॅन मध्ये धडक होऊन हा अपघात घडलाय.

यावेळी शाळेच्या व्हॅन मधील 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थांना उपचारासाठी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. सिध्दी संजय राठोड,यश संजय राठोड, रुद्राक्ष घुगे,अनुष्का हेळगे,आयुष पवार, मानसी नेमाने, शाश्वत काळे,भावना देवडे,भक्ती कोल्हे,जान्वही हजारे असे किरकोळ जखमी विद्यार्थांची नावे आहेत. तर दोन्ही वाहनाच्या चालक सुध्दा जखमी आसून त्यांवर ही रुग्णालयात उपचार सुरू आहे.


दरम्यान तालुका जालना पोलिस आणि कदीम जालना पोलिसनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली असून तपास सुरू केला आहे, पोलिस पुढील कारवाई करेल अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलीय. या घटनेनंतर शहरात क्षमतेपेक्षा अधिक मुलांची प्रवासी वाहनातून होणारी वाहतूक यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही कुलकर्णी यांनी दिलाय.

ही बस 2017 नंतर रोडवर वाहतूक करण्यासाठी सक्षम नसल्याने पुणे rto ने सांगितलेल असल्याचे समजते. विशेष म्हणजे या गाडीचे सप्टेंबर 2023 मध्ये इन्शुरन्स संपलेलं आहे. तरीही शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ सुरूच होता. ही बस महिंद्रा मॅक्सिमो मिनी व्हॅन असून, हे स्कुल बस अद्यापही पुणे येथील ट्री हाऊस हायस्कूल च्या नावावर आहे. या अपघातात जवळपास 14 विद्यार्थी जखमी झाले आहेत.


ही स्कुल बस पुणे येथील ट्री हाऊस हायस्कूलच्या नावावर नोंदणीकृत असून, जालना येथील किड्स कॅम्ब्रिज स्कुल इंदेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरत होती. दरम्यान दोन्ही वाहन कदिम जालना पोलिस ठाणे येथे लावण्यात आले आहेत.

The Expose News
Author: The Expose News

Leave a Comment

Read More

0
Default choosing

Did you like our plugin?

Read More